charolya marathi prem kavita
चारोळी (चार + ओळी) (इंग्रजी: Owls) म्हणजे चार ओळीची कविता होय. आणि या चारोळीच्या संग्रहाला (कडव्यांना) चारोळ्या (चार + ओळ्या) म्हटले जाते.
कुठल्याही विषयवार आपण चार ओळींची कविता लिहू शकतो चारोळी ही कुठल्याही विषयांवर कमी शब्दात भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे, आज आपण चारोळ्या प्रेमाच्या, चारोळ्या मैत्रीच्या आणि चारोळ्या विरहाच्या या लेखात पाहू, या चारोळ्या नक्की तुमच्या हृदयास भिडतील आणि यातील बऱ्याचश्या चारोळ्या या तुमच्या जीवनातील प्रसंगाशी नक्की जुळतील, जर या लेखातील चारोळ्या तुम्हाला खरोखर आवडल्या तर कॉमेंट्स मधून नक्की कळवा, आणि अजून कुठल्या प्रकारच्या चारोळ्या तुम्हाला हव्या आहेत तेही टिप्पण्या मधून नक्की सांगा,
धुंद पाखरांच्या सवेमनसोक्त मन हवेत उडावेवारे जरी बदलत असले तरीबांध संस्कृतीचे सांग कसे तोडावे?
आज काल वाटेवरचा मोगराहीनेहमीसारखा फुलत नाही,कदाचित त्याला ही समजल असेल,की तू मझाशी बोलत नाही.
charolya marathi maitri
माझ्या डोळ्यांची भाषातुझ्या डोळ्यांनी बोलशील का?सावली सारखी सखेमाझ्या सोबत चालशील का?
तू पाहता क्षणी मजलाकाळजाचे ठोके चुकलेलाजेचा पडदा येता मधेमी तुज पाहण्यास मुकले.
मैत्री म्हंटली कीआठवतं ते बालपणंआणि मैत्रीतून मिळालेलं तेखरंखुरं शहाणपण.
कोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाही.
मैत्रीचं हे नातंसगळ्या नात्यात श्रेष्ठंहे नातं टिकवण्यासाठीनकोत खुप सारे कष्टं
मैत्रीचा हा धागारेशमापेक्षाही मऊ सूतमैत्रीच्या कुशीतच शमतेमायेची ती सूप्त भूक
मैत्रीच्या सहवासातश्रम सारे विसरता येतातपण खऱ्या मित्रमैत्रिणी मिळवण्यासाठीकाहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजेरखरखत्या उन्हात मायेची सावलीसुखाच्या दवात भिजूनचिंब चिंब नाहली
सरळ आली अंगावरचुंबन दिले गालावरकवेत घे ना म्हणत होतीवार्याची ती झुळूक होती
तुला हसताना पाहण्यासाठीमी स्वतः विदुषक झालोतू सासरी गेल्यावर मात्रमी सर्कशीतच पर्मनंट झालो .
मित्र म्हणजेएक आधारएक विश्वासएक आपुलकीआणि एक अनमोलसाथ जी मला मिळालीतुझ्या रूपाने .
असे माझे प्रेम-
डोळ्यातील आसवे लपवतओठांना हसत ठेवायचेतुझ्यावर प्रेम करून सुदधातुझ्यापासून लपवायचे .
आपल्या आयुष्यात कोण येणारहे काळ ठरवतआपल्या आयुष्यात कोण हवहे आपल मन ठरवत .आणि आपल्या आयुष्यातकोणी टिकून राहणारहे आपली वागणूक ठरवत .
अजूनही जातो त्याच बागेतरातराणी फ़ुलतानापण मला फ़क्त दिसतेसकाळी ती कोमेजताना…
शुन्यच आहे आयुष्य माझेउणे तु असतानाधरलास का हात सांग तुसोडुनच जायचे असताना…
माहीत नाही पुन्हा कधी भेटुवेगळ्या रस्त्यावर चलतानाअन जुळतील का आपल्या तारावेगळ्या जगात राहताना…
झालेच नाही आपले बोलणेसगळा एकान्त असतानाआज सगळं सुचत जातयएकटा कविता करताना…
तू जाण्याचे इशारे जेव्हा जाणवतील,नकळत तेव्हा माझे डोळेही पाणावतील.नाही वाटत जगावस तू सोबत नसताना,किती विरह सहन करू तू जवळ असताना,
मी समोर येता तूतोंड फिरवून घेतेस,तू होणार नाहीस माझीयाची जाणीव का करून देतेस….
दिवसा उजेडी स्वतः ला सावरताना,सायंकाळी सूर्य अस्ताला जाताना,रोज रात्री जागरण करताना…पांघरूण घेऊन अश्रू ढलताना….
मी तर नेहमीचं अश्रूं पुसले गं तुझे,तु मात्र माझ्या अश्रूंची किंमत ठेवलीचं नाही..मी तर नेहमीचं रडलोय गं तुझ्यासाठी,तु मात्र माझ्यासाठी एक थेँबही गाळला नाही..
निरोप आला एकज्याने बोलावले होते मलावाट पाहत होतीती ही येण्याची माझ्या.
अ.सं.. कधी वाटलंच नव्हतं..??जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..अनोळखी नजरेनं अशा..माझ्याकडे पाहशील..
0 टिप्पण्या