Navratri marathi aarti | navratri aarti in marathi free download

या महिन्यात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि या उत्सवात आपला उत्साह द्विगुणित व्हावा अशी मी प्रार्थना करतो, आजचा हा लेख नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून लिहीत आहे, यामध्ये तुम्हाला देवीच्या आरतीचा संग्रह करून दिलेला आहे, आरतीचे स्वरूप text जे तुम्ही कॉपी करू शकता, Photos & Images जे तुम्ही डाउनलोड करून इतरांना पाठवू शकता, आणि pdf  जे तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता, अश्या तीन स्वरूपांमध्ये आरतीचा संग्रह या लेखात तुम्हाला बघायला मिळेल. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. 


navratri marathi aarti


आरती त्रिपुरसुंदरेची

आरती त्रिपुरसुंदरीची ! अंबामाय रेणुकेची !!धृ!!
मस्तकी कुंकूमाची शोभा । लल्लाटी शोभे मृगेनाभा !
नाकी मौक्तिकाची प्रभा ! नृत्य करिती पुढे रंभा !

(चाल) - मेळे आले योगिनीचे  चरण वंदिती अंबिकेचे !
गाणे सुरस तुंबराचे ! कात्यायनि गाती !
येऊनी गणपती चकित सरस्वती !
वाणी मग खुंटली शेषाची ! वार्ता काय मानवाची !
आरती त्रिपुरसुंदरेची !!१!!

ऐसा तिचा गुणमहीमा ! न कळे योजन जनसिमा !
हरि-हर चरण वंदी ब्रम्हा ! अंकी बैसवी परशुरामा ! (चाल) पाहे रहाट सृष्टीची !
भक्ती जैसी असे ज्यांची ! वासना पुरवि मनोरथाची ! 
लागली आस, तारी भक्तास ! दिसे अभ्यास गाढ मग पडली सद्गुरुची !
वाट दाखवी निज चरणाची !!२!!

कैलासपुरी वास तिचा ! अवतार धरिला रेणुकेचा !
नाश शुंभा निशुंभाचा ! महिषासुरादी कपटांचा! (चाल) करुनी बैसली मुळपीठी !
येती सूर तेहतीस कोटी ! करिती सुमनांची वृष्टी !
ब्रम्हानंदी, नाव आनंदी राहे स्वच्छंदी ! सीमा झाली वर्णनाची !
उपमा देऊ कोणाची !!३!!

पिवळा पितांबर नेसे ! पिवळी चोळी अंगी विलसे !
लगबग लगबग धावतसे ! आपुल्या भक्ता पाहतसे (चाल) यात्रा आली कार्तीकेची !
अंकीत झाली प्रेमळाची ! गर्जना होत सबळांची वाद्ये वाजती भक्त नाचती !
किर्ती वर्णिती करिती स्तुती अपर्णेची अपरंपार लिला तीची !!४!! 

सत्व रज तमोगुणा ! प्रसवे सा वयव निगमागमा !
माहेश्वराची ही उमा ! विष्णुची ही झाली रमा !
सावित्री ही विरंचीची ! कांता झाली कश्यपाची नट नाटकी शक्ती साचि
हिच रेणुका त्रिभुवन, नायिका, सोडु नका !
वासना पुरविल दासाचि चला रे भक्ती करु तिची ! आरती त्रिपुरसुंदरीची !!५!!


navratri aarti sangrah marathi

आरती - दुर्गे दुर्घट भारी

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |
वारी वारीं जन्ममरणांते वारी ।
हारी पडलों आतां संकट निवारी ॥१॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥धृ॥

त्रिभुवनभुवनी पाहतां तुजऐसी नाहीं ।
चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ।।
साही विवाद करितां पडिलों प्रवाही ।
ते भक्तांलागी पावसि लवलाही ॥ जय || २ ||

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशांपासुनि सोडवि तोडीं भवपाशा ।।
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा ।।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥

जयदेवीजय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ||३||

durge durgat bhari 


महालक्ष्मीची आरती

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी !
वससी व्यापक रुप तू स्थूल सूक्ष्मी !! धृ.!!

करविरपुरवासिनी सुरवर मुनिमाता !
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता
कमलाकरें जठरी जन्मविला धाता !
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुणगाता !!१!!

मातुलिंग गदा खेटक रविकिरणी !
झळके हाटक - वाटी पियुष रसपाणी !
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी !
शशिकरवदना राजस मदनाची जननी जय देवी !!२!!

ताराशक्ति अगम्य शिवभजका गौरी !
सांख्य म्हणति प्रकृति निर्गुण निर्धारी !
गायत्री निजबीजा निगमागम सारी !
प्रकटे पद्मावती निजधर्माचारी जया देवी !!३!!

अमृत भरिते सरिते अधदुरिते चारी !
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारी !
वारी मायापाटल प्रणमत परिवारी !
हे रुप चिद्रुप दावी निर्धारी जय देवी !!४!!

चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी !
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी 
!
पुसोनी चरणांतळी पदसुमने क्षाळी !
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी !

navratri devi chi aarti marathi

आरती - लो लो लागला आंबेचा.

लोलो लागला अंबेचा,
भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा,
धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।

प्रपंच खोटा हा, मृगपाणी घोरे फिरतो प्राणी।
कन्या-सुत-दारा-धन माझे मिथ्या वदतो वाणी।
अंती नेतील हे यमदुत। न ये संगे कोणी।
निर्गुण रेणुका कुळदेवी जपतो मी निर्वाणी।। लोलो।।१।।

पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर।
नयनी देखिला आकार। अवघा तो ईश्वर।
नाही सुख – दुःख देहाला कैचा अहंकार।
पाहे परमात्मा तो ध्यानी भासे शून्याकार।। लोलो।।२।।

ध्याता मुद्रा ही उन्मनी लागे अनुसंधानी।
निद्रा लागली अभिध्यानी जें का निरंजनी।
लीला वर्णिता स्वरूपाची शिणली शेशवाणी।
देखिला भवानी जननी त्रैलोक्यपावनी।। लोलो।।३।।

गोंधळ घालील मी अंबेचा घोष अनुहाताचा।
दिवट्या उजळूनिया सदोदित पोत चैतन्याचा।
आहं सोहं से उदो उदो बोलली चारी वाचा।।। लोलो।।४।।

पाहता मूळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ जेथ जगदंबा अवधूत।
दोघे भोपे भट।
जेथे मोवाळे विंजाळे प्रणीता पाणी लोट।
तेथे तानाजी देशमुख झाला ब्रम्हनिष्ठ।।५।।

navratri marathi aarti lyrics

आरती देवीची - विपुल दयाधन


विपुल दयाधन गरजे तव हृदयावर श्री रेणुके हो !
पळभर नरमोराची करुण, वाणी ही आयके हो !
श्रमलीस, खेळूणी, नाचुनी, गोंधळ, घालुनी, ब्रम्हांगणी हो !
निजलीस कशी दीनाची चिंता सोडुनी अंतःकरणी हो 
उठी लवकरी जगदंबे त्रैलोक्याची तू स्वामिनी हो !
विधी हरी हर अज्ञानी पूर्णज्ञानी तू शाहणी हो !

समर्थ परमेश्वरी तू अनंतब्रम्हांड नायिका वो ! पळभर !!१!!
शरणागत मी आलो परि बहु चुकलो बोलावया हो !
तुज जननीचे नाते लाज न वाटे लावावया हो !
परि तू जननी दीनांची अनाथांची तुज बहू दया हो
कळेल तैसे करी परी निज ब्रीद रक्षी मम पालिके हो ! पळभर !!२!!

भवगते पिडलो भारी मजला दुःख हे सोसेना हो !
अजून अंबे तुजला माझी करुणा का येईना हो !
तारी अथवा मारी धरीले चरण मी सोडीना हो !
कृपा केल्या वाचुनी विन्मुख परतुनी मी जाईना हो !
तुजविना जगी कोणचे वद पद प्रार्थावे अंबिके हो ! पळभर !!३!!

ऐकुनी करुणावाणी हृदया सप्रेमे द्रवली हो !
प्रसन्नमुख जगदंबा अंबा प्रसन्नती जाहली हो !
अजरामर वर द्याया प्रगटुनी पुढे उभी राहीली हो !
भक्तांकीत अभिमानी विष्णुदासाची माऊली हो !
जी निज इच्छामात्रे सूत्रे हालवी कवतुके हो ! पळभर !!४!!

navratri marathi aarti


श्री जगदंबा मातेची आरती - जय जय जगदंबे


जय जय जगदंबे ! श्री अंबे रेणुके ! कल्पकदम्बे !!धृ !!

अनुपम स्वरुपाची, तुझी घाटी ! अन्य नसे या सृष्टी !
तुज सम रुप दुसरे परमेष्टी ! करिता झाला कष्टी !
शशिरस रसरसला वदनपुटी ! दिव्य सुलोचन दृष्टी !
सुवर्ण रत्नांच्या शिरीमुकुटी ! लोपती रवी शशी कोटी !
तुज स्तवीले हे रम्बे ! मंगळ सकळारंभे !
जय जय जगदंबे ! श्री अंबे रेणुके ! कल्पकदम्बे !!१!!

कुंकुम चिरी शोभे मळवटी ! कस्तुरी टिळक लल्लाटी !
नासीक अती सरळ हनुवटी ! रुचिरामृतरस ओठी !
समान लवल्या धनुकोटी ! आकर्ण लोचन भृकुटी !
शिरी निट भांग वळी उफाराटी ! कर्नाटकची घाटी !
भुजंग निळ रंगा परि शोभे ! वेणी पाठीवरी लोंबे !!२!!

जय जय जगदंबे ! श्री अंबे रेणुके ! कल्पकदम्बे !! धृ !!

कंकणे कनकाची मनगटी ! दिव्य मुद्या दश वोटी !
बाजुबंद नगे बाहुवटी ! चर्चुनी केशर ऊटी !
सुगंध पुष्पाचे हार कंठी! बहु मोत्यांची दाटी !
अंगी नवी चोळी जरी काठी ! पीत पितांबर तगटी !
पैंजण पदकमळी अति शोभे ! भ्रमर घावती लोभे !!३!!

जय जय जगदंबे अंबे रेणुके ! कल्पकदम्बे !!धृ !!

सामक्ष तु क्षितीच्या तळवटी! तूची स्वयं जगजेठी !
ओवाळीता आरती दिपदाटी घेऊनी कर संपुष्टी
करुणामृत हृदये संकष्टी! धावसी जरी निजभेदी !
तरी मग काय उणे या लाभे ! धाव पाव अविलंबे !!४!!

जय जय जगदंबे ! श्री अंबे रेणुके ! कल्पकदम्बे !!धृ !!

navratri devi aarti marathi

आरती श्री नवरात्रीची - अश्वीन शुद्ध पक्षी

अश्वीन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो !
प्रतीपदे पासुनी घटस्थापना करुनी हो !
मुळ मंत्र जप करुनी भोवती रक्षक ठेवूनी हो !!
ब्रम्हा विष्णु, रुद्र आईचे पुजन करीती हो !!१!!

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो !
उदोकार गर्जती काय महिमा वर्ण तिचा हो !!!धृ!!

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो !
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो !!
कस्तुरी मळवट भांगी शेंदुर भरुनी हो !
उदो कार गर्जती सकळा चामुंडा मिळुनी हो !
उदो बोला उदो !!२!!

तृतीयेचे दिवशी अंबे श्रृंगार मांडला हो !
मळवट, पातळ, चोळी कंठीहार मुक्ताफळा
अष्टभुजा मिरविता कासे पितांबर पिवळा हो !
अष्टभुजा मिरविता अंबे सुंदर दिसे लिला हो !

उदो बोला उदो !!३!!

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो !
उपासका पाहसी अंबा प्रसन्न अंतकरणी हो !
पूर्णकृपे पाहसी जगन्माते मनमोहीनी हो ! भक्तांची माउली भक्त येती लोटांगणी हो !

उदो बोला उदो !!४!!

पंचमीचे दिवशी व्रत उपांग ललीता हो ।
अर्ध्य पाद्य पुजने तुजला भवानी स्तवीता हो!
रात्रीचे समयी करिता जागरण हरी कथा हो !
आनंदे प्रेम ते आले सद्भावने क्रिडता हो !

उदो बोला उदो !!५!!

षष्टीचे दिवशी भक्त आनंद वर्तीला हो !
घेऊनी दिवट्या हस्ते हर्षे गोंधळ घातला हो !
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो !
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो !

उदो बोला उदो !!६!!

सप्तमीचे दिवशी सप्तश्रृंग गडावरी हो !
तेथे तु राहसी भोवती पुष्पे नानापरी हो !
जाई जुई शेवंती पूजा रेखिवली बरवी हो !
भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचेवरी हो !

उदो बोला उदो !!७!!

अष्टमीचे दिवशी अष्ट भुजा नारायणी हो !
सह्याद्री पर्वती उभी पाहीली जगतजननी हो !
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो !
स्तनःपान देऊनी सुखी केले अंतकरणी हो !

उदो बोला उदो !!८!!

नवमीचे दिवशी नव दिवसाचे पारणे हो !
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो !
षडरस अन्ने नैवेद्यासी अपयली भोजनी हो !
आचार्य ब्राम्हणा तृप्त केले कृपे करुनी हो !

उदो बोला उदो !!९!!

दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो !
सिंहारुढ करी शस्त्रे सवळ ती घेऊनी हो !
शुभानिशुंभादीक राक्षस सर्वही मारुनी रणी हो विप्र रामदासा आश्रय दिधला निज चरणी हो ।

उदो बोला उदो !!१०!!
navratri aarti marathi udo bola udo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या